जीवाची होतीया काहिली फेम कलाकारांचा थक्क करणारा डान्स… पहा व्हिडिओ

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गणेश वंदना, लग्नगीत, आई एकविरेची महती सांगणारे गाणे अशा लोकनृत्याच्या आविष्कारातून करण्यात आलेला संस्कृतीचा जागर आणि महागरब्याने कार्यक्रमाला खर्‍या अर्थाने रंगत आली. ज्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या चेहर्‍यावरील उत्साह, आनंद ओसंडून वाहत होता. शेवटच्या दिवशी अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पीएनपी संकुलातील प्रभाविष्काराची यशस्वी सांगता झाली. जिवाची होतीया काहिली फेम राज हंचनाळे व प्रतीक्षा शिवकर यांनी कोळीगीतावर मनसोक्त केलेले नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. कलाकारांसोबत बेधूंदपणे कला सादर करणार्‍या या कलाकारांना उपस्थित रसिकांनी भरभरुन दाद दिली.

Exit mobile version