पुरुषांत किसन ताडवी, महिलांमध्ये प्रियांका पाईकरावची बाजी
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड हिल्स मॅरेथॉन 2023 पर्व 2 च्या स्पर्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणात रविवार, दि. 27 रोजी महागाव येथे पार पडल्या. सुधागड हिल्स मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटर, 10 किलोमीटर व 5 किलोमीटर अशा तीन प्रकारात स्पर्धा होत्या. दरम्यान, पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये किसन ताडवी याने, तर महिलांमध्ये प्रियांका पाईकरावने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील राज्यातील स्पर्धकानी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
या स्पर्धा जुहू सुपरहिट टीम तसेच विवेक विचारे, अंजली असुदानी, सुधांशू काला, अरुणा पांडे, रिचा काला, भावीन पारिख, राहुल जी टींबाडिया यांच्या माध्यमातून आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेसाठी मुख्य मार्गदर्शक गुरुमुर्ती नायक, ब्रिस्टन मिरांडा हे होते. या स्पर्धेदरम्यान साई डान्स अकॅडमी यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करत स्पर्धकांची मने जिकली. तसेच सुधागड 07 यामध्ये स्थानिक कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेनिमित्त सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार, माजी तहसीलदार दिलीप रायन्नावार, राजेश मपारा, विष्णू पाटील, राजेंद्र राऊत, दिनेश चिले, महागाव ज्येष्ठ नागरिक दगडू पिंगळे, अनंत चोरगे, रामचंद्र सुतार यांसह गावातील महिला नवतरुण वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चोरगे व निलेश नाईक यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे..
हाफ मॅरेथॉन पुरुषय:- खुला-किसन तडवी, रामेश्वर मुंजल, विशाल कंबिरे. तर, महिलांमध्ये प्रियंका पाईकराव, वेदिका मंडलिक, राजश्री माल्या यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.
45 वर्षापेक्षा कमी वयोगट पुरुष:- अनंत गावकर, सिद्धेश बर्जे, रामू पारधी.
45 वर्षापेक्षा अधिक वयोगट:- जयपाल भोयर, जॉर्ज थॉमस, उदय बोभाटे. 5 किलोमीटर पुरुष:- अमोल ताम्हणकर, निमिश पावसकर, अन्वय नाडकर्णी. 5 किलोमीटर महिला:- एकता सी, गौरी चव्हाण, पाऊ छान हू. 10 किमी पुरुष:- भविष्य कौशिक, अक्षय कुमार, अतुल बर्डे. तर, महिलांमध्ये सोनाली देसाई, साक्षी भंडारी, पद्मा कारंडे.
10 किमी 14 ते 30 वर्षे पुरुष:- आसिफ खान, अफ्ताफ अन्सारी, सुमित मोरे. 30 ते 40 वर्ष:- अनिल कोरवी, देसराज मीना, चिंतामण गायकवाड. 40 ते 50 वर्ष:- नाथा गिरनेकर, मनीलाल गावित, समीर मांजरेकर. 50 ते 60 वर्ष:- रवी कळशी, आंद्रे, नीरज देसाई. 60 वर्षांवरील:- पांडुरंग चौगुले, लॉन्स लॉट, संजय जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.