सुधागड तालुका मराठा समाजाची कार्यकारिणी जाहीर

| पाली | वार्ताहर |

सुधागड तालुका मराठा समाजाची सर्वसाधारण सभा पाली येथील मराठा समाज भवन स्व. सदूराम सखाराम-साजेकर सभागृहात नुकतीच पार पडली. या सभेत समाजाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यत आली. यात तालुका अध्यक्षपदी धनंजय साजेकर यांची निवड करण्यात आली. तर संचालकपदी अ‍ॅड. नितीन शेवाळे, अरविंद दंत आणि मध्यवर्ती कार्यकारिणीत समृद्धी यादव, निहारिका शिर्के, साक्षी दिघे, दीपाली बेलोसे व स्नेहा भोईर या पाच संचालिकांची निवड करण्यात आली.

या सभेत सुधागड तालुका मराठा समाजाचे सरचिटणीस जीवन साजेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त, जमा-खर्च नवीन ठराव सभेमध्ये उपस्थितांना वाचून दाखवला. या कार्यक्रमात मराठा समाजाच्या सर्व विभागीय अध्यक्ष व समाज बंधू-भगिनिंनी नवनिर्वाचित अध्यक्ष तसेच संचालक मंडळाचे स्वागत केले.

Exit mobile version