सुगवे, कशेळे, नांदगाव सहकारी सोसायटीवर शेकापचे अध्यक्ष विराजमान

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सहकारी सेवा संस्था यांच्या संचालक पदाच्या निवडणुकानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने वर्चस्व कायम राखले आहे. तालुक्यातील सहकारी आदिवासी सेवा संस्थामधील नांदगाव, कशेळे आणि सुगवे या सोसायटीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष बिनविरोध बनले आहेत. तर आंबिवली आदिवासी सोसायटीच्या अध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत.

कर्जत तालुक्यातील आंबिवली, सुगवे, कशेळे आणि नांदगाव या आदिवासी विविध विकास कार्यकारी सहकारी सेवामध्ये नव्याने निवडून आलेले संचालक यांच्यामधून अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. कशेळे आदिवासी विविध विकास कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाचे देहू कवठे यांची तर उपाध्यक्ष म्हणून शेकापचे रोहिणी हरपुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर तालुक्यातील सुगवे आदिवासी विविध विकास कार्यकारी सोसायटीमध्ये संचालक मंडळ यांच्यामधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यात आले.त्यात अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे शिवाजी पिंगळा यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
नांदगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीमध्ये अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे दत्तात्रय झुगरे यांची तर उपाध्यक्ष अशोक भुसाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी तालुक्यातील आंबिवली आदिवासी विविध विकास कार्यकारी सोसायटीमध्ये अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक मेचकर यांची तर उपाध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे महेश म्हसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य नारायण डामसे, शेकाप तालुका प्रभारी चिटणीस श्रीराम राणे, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गजानन पेमारे, शेकाप आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष बबन भालेराव, आरडीसी बँकेचे माजी संचालक प्रकाश फराट, माजी सरपंच रवींद्र झांजे, शेकापचे विभाग चिटणीस पांडुरंग बदे, युवा कार्यकर्ते महेश म्हसे, मंगेश खेडेकर, कशेळे ग्रामपंचायतचे उपसरपंच आदित्य गायकवाड आदी उपस्थित होते.

Exit mobile version