डाक कर्मचार्‍यांची गळफास घेऊन आत्महत्या

। माणगाव । प्रतिनिधी ।
गोरेगाव येथे सेवेत असलेल्या खात्यातील एका 32 वर्षीय कर्मचार्‍याने आपल्या माणगाव सिद्धीनगर येथील भाड्याने राहत असलेल्या घरात पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना बुधवारी (दि.13) घडली. या घटनेची फिर्याद विनोद भागवत राऊत (वय-33) रा.कचेरी रोड माणगाव मूळ रा.नेकनूर जि. बीड यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने माणगाव तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील डाक विभाग हादरला असून डाक सप्ताहात या कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याने रायगडात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि.नं.37/2021 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक के.डी.जाधव हे करीत आहेत.

Exit mobile version