पोलीस दलात भरती झाल्याबद्दल केले अभिनंदन
| माणगाव | वार्ताहर |
उम्मत ए मुस्लीमा कमिटीतर्फे रायगड पोलीस दलात भरती झाल्याबद्दल तालुक्यातील गोरेगाव येथील कु.सुमय्या इब्राहिम मल्ली हिचा पालकांसमवेत माणगाव येथे रविवारी (दि.22 ) रोजी झालेल्या ईद ए मिलाद निमित्त आयोजित कार्यक्रमात यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित नगरसेवक प्रशांत साबळे, नगरसेवक दिनेश रातवडकर व माणगाव उम्मत ए मुस्लीमा कमिटीचे मुफ्ती मुझफ्फर सेन, अकबर परदेशी, सिराज परदेशी, शादाब गैबी, बशीर करेल, सर्फराज अफ़वारे, सिराज अफ़वारे, फहद करबेळकर, शहानवाज अत्तार, नदीम परदेशी, इरफान हाजीते, रफिक जामदार, शाजान जळगावकर, अफाक दांडेकर, रिहाना मुल्ला, सुहेब परदेशी, आदिल गजगे, बशीर करदेकर, शब्बीर परदेशी, ताबिश जामदार, रिजवान चरफरे, हाजीमिया करदेकर, फहीम वाडेकर, इस्माईल पालेकर, मुसद्दीक जिलानी, फैज परदेशी, मुसतुफा वाडेकर, वसीम सनगे, मोहसीन नदाफ, तौसिफ़ सैयद, इंझमाम गोटेकर, सलमान कागदी, नदीम दुस्ते, मुन्नवर शेख, मन्सूर मुकादम, रिजवान मुकादम, रुमान जामदार व सहकार्यांनी सुमय्या मल्ली हिचा रायगड पोलीस दलात भरती झाल्याबद्दल यथोचित सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्या.