। खरोशी । वार्ताहर ।
पेण शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या आई सुमीत्रा शंकर पाटील(82) यांचे राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी पेण येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत करण्यात आला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय व क्षेत्रातील अनेकांनी गर्दी केली होती.त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांची दशक्रिया विधी 4 नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्रविश्वेश्वर मंदिर, पेण तर दिवस कार्य 7 नोव्हेंबर रोजी शिक्षक सोसायटी, पेण येथील राहत्या घरी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.