। अलिबाग । प्रतिनिधी ।
कृषीवलचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अविष्कार देसाई यांच्या मातोश्री सुनंदा रंगराव देसाई यांचे रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनसमयी त्या 76 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
सुनंदा देसाई या स्वभावाने मनमिळावू होत्या. रविवारी (दि.16) सायंकाळी अलिबागमधील घरात असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला. अलिबागमधील श्रीबाग येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. संस्कार विधी व शोकसभा मंगळवारी (दि.18) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अलिबागमधील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती देसाई कुटूंबियांनी दिली.