| खोपोली | वार्ताहर |
खोपोली शहराला अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यासाठी प्रशासनाने दिलेल्या वेळेत मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य पाऊले उचलावीत अन्यथा पक्षभेद बाजुला ठेवत आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, अशा इशारा माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यानी दिला आहे.
टाटाचं पाणी कंपनीच्या मालकीचं राहिल नसून जनतेच्या मालकीच आहे. एका आयोगाच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे टाटा पाणी सोडणार नाही असं होणार नाही म खोपोलीचा कायमचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विचाराच्या लोकांना सोबत घेवू असे मसुरकरांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष मनेष यादव, अतुल पाटील, सुवर्णा मोरे, मंगेश दळवी, रमेश जाधव, महादू जाधव, केविना गायकवाड, निलेश औटी, दिनेश गुरव, विनायक तेलवणे, किशोर पाटील, भास्कर लांडगे विनोद रजपूत, विशाल गायकवाड, तैफीक करंजीकर यांच्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील पाणी समस्येबाबत बोलताना त्यांनी जांबरूग धरण तीन डोंगरामध्ये आहे कोणतेही गाव न उठवता,अडचण न करता धरणाची उंची वाढवली तर खोपोली शहरासह तालुक्याचा पाणी प्रश्न मिटेल, अशी अपेक्षा मसुरकर यानी व्यक्त केली.
टाटा व्यवस्थापनाकडून पाणी पुरवठा योजनांसाठी सातत्याने कमी जास्त पाणी सोडत आहे. परंतु खोपोली नगरपालिकेची पाणी उचलण्याची क्षमता 100 टक्के वरून 50 टक्के वर आली आहे, त्यामुळे खोपोली शहराला अनेक भागात पाण्याची कमतरता भासत असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी पहाणी केली असल्याचे मसूरकर यांनी सांगितले. शिवाय आणि मुख्याधिकारी, प्रशासक अनुप दूरे यांनी गांभीर्याने लक्ष देत असल्याचे त्यानी सुचित केले..