| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंड्यातील चणे विक्रेते व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असलेले सुरेश अनाजी वाडेकर यांचे दि. 14 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. सदैव हसतमुख, अजातशत्रू म्हणून ओळख असलेले सुरेश वाडेकर यांचे अकस्मात निधनाने रेवदंडा शहरात सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी, रवींद्र, अमर ही दोन मुले, दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रेवदंडा हरेश्वर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे दशक्रिया विधी हरेश्वर मंदिराजवळ दि. 23 सप्टेंबर रोजी होणार असून, उत्तरकार्य विधी दि. 26 सप्टेंबर रोजी त्यांच्या रेवदंडा निवासस्थानी होणार आहे.







