| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा शिवनगर येथील अनंत परशुराम राऊत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून, मृत्यूसमयी ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार, दि.20 रोजी श्रीक्षेत्र गुळसुंदे येथे होणार असून, उत्तरकार्य सोमवार, दि.23 सप्टेंबर रोजी शिवनगर येथील राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या जाण्याने राऊत कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे.