खारघर ठाण्यातून संशयित फरार

। पनवेल । वार्ताहर ।

बेकायदा वास्तव्य करणार्‍या नागरिकांना खारघर व तळोजात सहज खोल्या भाड्याने मिळत असल्याने पोलिसांनी वारंवार खोलीमालकांना भाडोत्र्यांची माहिती देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला अनेकदा खोली मालकांकडून हरताळ फासला जातो. अशाच एका प्रकरणामध्ये संशयित आरोपीला पोलीस ठाण्यात आणले होते. काही दिवसांपूर्वी खारघर पोलिसांनी नायजेरियन नागरिकांकडून अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला होता. यातील रांजणपाडा गावात राहणार्‍या 56 वर्षीय संशयिताने नायजेरीयन व्यक्तीला भाड्याने घर देण्यापूर्वी पोलिसांना कळविले नव्हते. त्यामुळे या व्यक्तीला अटकेची कारवाईसाठी खारघर पोलीस ठाण्यात आणले होते. दरम्यान, हा संशयीत खारघर पोलीस ठाण्यातून फरार झाला आहे. यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे हा संशयित फरार झाला का, याची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत सुरू आहे.

Exit mobile version