परमबीर सिंग यांच्यासह 25 अधिकार्‍यांचे निलंबन?

गृहखात्याकडे प्रस्ताव
मुंबई | प्रतिनिधी |
खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहखात्याकडे पाठविला आहे. त्यांच्यासह 25 पोलिस अधिकार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठविला आहे.
संजय पांडे यांनी गृहखात्याकडे पाठवलेल्या यादीत परमबीर सिंग यांच्यासह वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपी असलेले चार उपायुक्त व सहाय्यक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे. गृहखात्याने या प्रस्तावावर सावध भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील सर्व अधिकार्‍यांची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र लाभार्थ्यांना रेशनकार्ड द्या : छगन भुजबळ सिंग यांच्याविरुद्ध चौकशी समितीने अटक वॉरंटही बजावले आहे. तरीही सिंग अद्याप पसार आहेत. या प्रकरणी पोलिस खात्याने सविस्तर चौकशी करून निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविला आहे.

Exit mobile version