मुख्याध्यापिकेला निष्काळजीपणा भोवला; आयुक्तांकडून तात्काळ निलंबन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

शिक्षण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका अंतर्गत असलेल्या श्री गणेश विद्या मंदिर शाळा क्र.6 मध्ये विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवावयास लावणे ही बाब अत्यंत गंभीर व चुकीची असल्याने याची तातडीने दखल घेऊन पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांना तात्काळ निलंबित केले असून, शिक्षण अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पनवेल महानगरपालिका अंतर्गत असलेल्या या शाळेमध्ये सदरील कामे करण्यासाठी अक्षयपात्र या संस्थेची निवड शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात आलेली आहे. सदरील कामे करणाऱ्या आया यांनाही बदलावे, असे स्पष्ट आदेश संबंधित संस्थेला याप्रकरणी देण्यात आलेले आहेत. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन सुदाम हिलम यांना याप्रकरणी निष्काळजीपणा केल्यामुळे तात्काळ निलंबित करण्यात आले, तर पनवेल महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

पनवेल महानगरपालिका अंतर्गत असलेल्या सर्व शाळांमध्ये अशा प्रकारच्या बाबींसंदर्भात कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा चालणार नाही. सर्व संबंधितांनी अत्यंत जागरूकतेने लहान मुलांच्या बाबतीत सतर्क असावे, अशा ही सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version