। मुंबई । प्रतिनिधी ।
विरोधकांच्या तक्रारीनंतर योजना दुतांच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. आचारसंहिता काळात योजनादुत सरकारी पक्षाचं काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विरोधकांनी मुख्य निवडणुक अधिकारी यांचायाकडे तक्रार केल्यानंतर कामाला स्थगिती देण्यात आली आहे. सरकारी योजनांची माहीती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येक गावात 1 असे 50 हजार दुत नेमण्यात येणार होते. त्यासाठी राज्यभरातून जवळपास 2 लाखांहून अधिक अर्ज आले होते. यापैकी 514 योजना दुतांना आचारसंहितेच्या आधी नियुक्ती दिली होती. मात्र विरोधकांच्या आरोपानंतर मुख्य निवडणुक अधिकारी यांनी बैठक बोलवून याचा आढावा घेतला. त्यानंतर या योजनेच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.