। खोपोली । वार्ताहर ।
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या खोपोली शहर अध्यक्षपदी सुवर्णा मोरे यांची तर जिल्हाउपाध्यक्षपदी शिल्पा सुर्वे याची खा. सुनिल तटकरे यांनी नियुक्ती केली आहे. सुवर्णा मोरे गेल्या तीन वर्षापासून महिला शहर अध्यक्ष पदावर काम करीत असताना झालेल्या निवडणुका,आंदोलने,महिलांसाठी विविध उपक्रम रबवित असल्याची दखल पक्षसंघटनेने घेत पुन्हा महिल शहर अध्यक्षपदी मोरे यांची जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 17 जून रोजी सुतारवाडी येथे पालकमंत्री अदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे,महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे, गीता परलेचा,दिपाली चिंबुळकर,सायली दळवी यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.