स्वरा सागळेचे कॅरम स्पर्धेत सुयश

| पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील भैरव येथील रहिवासी तसेच सध्या ठाणे येथे वास्तव्यास असणारी स्वरा अनंत सागळे हीने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे. विश्व विद्यापीठाच्या वतीने 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र आणि गोवारीजन मध्ये राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ठाणे येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी आठवीमध्ये शिकणारी स्वरा अनंत सागले हिने सहभाग घेऊन सदर स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला. तिच्या या यशाबाबत सुधागड तालुक्यातील नागरिकांसह शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक वर्ग यांच्याकडून कौतुक होत आहे. तसेच स्वरा सागळे ला नुकतेच सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या वतीने सन्मानित देखील करण्यात आले.

Exit mobile version