स्वामींचा मुखवटा प्रतिष्ठापना सोहळा

| आगरदांडा | वार्ताहर |
वाणदे गावातील सद्गुरू श्री स्वामी समर्थ मठात स्वामींचा मुखवटा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. श्री नित्यानंद महाराज -नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता श्री स्वामीचा मुखवटा व श्री स्वामीची मोठी फ्रेम घेऊन वाणदे गावातील परिसरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर दुपारी 1 वाजता श्री स्वामीची मुखवटा प्रतिष्ठापना कल्याणचे नवनितानंद मोडक महाराज यांच्या हस्ते ब्राह्मणव्दारे करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्गुरु श्री स्वामी समर्थ मठ -देवगड, वेंगुर्ले, सावंतवाडी ,कुडाळ, ठाणे येथील मठ, डोंबिवली येथील मठ, अलिबाग येथील मठ, मुरुड तालुक्यातील या ठिकाणचे सर्व स्वामी समर्थक यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन नित्यानंद महाराज,नंदकुमार ठाकूर वाणदे यांनी केले होते.

Exit mobile version