स्वरांगी जाधव ठरली मिस टीन नवी मुंबईची मानकरी


| उरण | वार्ताहर |

वाशी, नवी मुंबई येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये उरणच्या स्वरांगी जाधव हिने ‘मिस टीन नवी मुंबई 2024’ तसेच ‘गॉडेस ऑफ एलिगन्स’ हे दोन टायटल मिळवत उरण तालुक्याच्या सौंदर्यात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. इयत्ता 12 वी मध्ये शिकणार्‍या स्वरांगीला नृत्य आणि गायनाचा छंद असून, सौंदर्य स्पर्धेत देखील तिने आपली जागा आता निश्‍चित केली आहे.

उरण शहरामधील कुंभारवाडा येथे एका सामान्य घरामधील स्वरांगी गणेश जाधव हिने स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण उरण तालुक्याचे नाव मुंबई, नवीमुंबईमध्ये उंचावले आहे. डॉक्टर स्मायली पॉल यांच्या संकल्पनेतून क्लासिक फॅशन फिरएसस्टा या सौंदर्य स्पर्धेचे वाशी येथील एक्झिबेशन सेंटरमध्ये आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 200 स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. या फेर्‍यांमधून स्वरांगीने पहिल्या 10 स्पर्धाकांमध्ये आपले स्थान कायम करत अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला. यावेळी तिला मिस टीन नवी मुंबई 2024 तसेच मगॉडेस ऑफ एलिगन्सफ हे दोन टायटल प्रदान करण्यात आले. स्वरांगीने स्पर्धेतील चमक दाखवत उपस्थितांना सौंदर्याची भुरळ घालत आपल्या उरण तालुक्याचे नाव मुंबई आणि नवीमुंबई सारख्या शहरामध्ये उंचावले आहे. तर तिच्या या यशाबद्दल तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्वरांगी सध्या उरणमधील यु.ई.एस. कॉलेजमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकत असून, अभ्यासातही उत्तम आहे. तर तिच्या या यशामुळे कॉलेजमध्ये देखील सन्मान मिळत आहे.

Exit mobile version