गावाच्या प्रगतीचे केले भरभरून कौतुक
। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील वाशी हवेली गावाला तामिळनाडूमधील निवृत्त आयएएस अधिकारी स्वर्णसिंह यांनी भेट देऊन गावाच्या प्रगतीचे कौतुक केले. जगन्नाथ तांडेल यांच्या नेतृत्वाखाली चालविण्यात आलेल्या योजनांमुळे गावाला नवी ओळख मिळाली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, जैविक शेती, हरित ऊर्जा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात गावाने घेतलेली झेप हे भारतातील इतर गावांसाठी अनुकरणीय ठरले आहे. अशा या आदर्श गावाला नुकतीच तमिळनाडूमधील स्वर्णसिंह, आयएएस (निवृत्त) यांनी भेट दिली. स्वर्णसिंह हे श्निवासन सर्व्हिस ट्रस्टचे अध्यक्ष असून एसएसटी ही टीव्हीएस मोटर कंपनीची सामाजिक जबाबदारी पार पाडणारी शाखा आहे. 2018 पासून एसएसटी अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या उपस्थितीत गावातील विविध प्रकल्पांचे निरीक्षण करण्यात आले. एसएसटी तर्फे सामाजिक विकासासाठी राबविण्यात येणार्या उपक्रमांबाबत त्यांनी गावकर्यांशी संवाद साधला.