बाल गिर्यारोहक शर्विकाकडून तैलबैला सर

सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अत्यंत कठीण व अवघड श्रेणीत गणला जाणारा, नैसर्गिक डाईक रचनेची कातळभिंत असलेला तैलबैला किल्ला अलिबागची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेली चिमुरडी शर्वीका म्हात्रे हिन सर केला आहे.
‘तैलबैला’ च्या या कातळभिंतीची भुरळ अलिबागच्या छोट्या गिर्यारोहक असलेल्या शर्विका जितेन म्हात्रे हिला देखील पडली. सह्याद्री पुत्र ट्रेकर ग्रुपचे सोमनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये शर्विकाने सहभाग घेतला होता. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी शर्विका व तिचे आईवडील यांनी अलिबाग सोडले. दुसर्‍या दिवशी किल्ल्यावर चढाई करायला सुरुवात केली. यादरम्यान शर्विका हीच उत्साह सगळ्यांना हुरूप देत होता. किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा शर्विका देत होती. आणि या चिमुरडीच्या घोषणांनी सहयाद्रीचा कातळ देखील दुमदुमून निघाला होता. तर सुरक्षा साधनांनी हा किल्ला सर करत तिने किल्ल्याच्या शिखरावर राष्ट्रध्वज आणि भगवा फडकवला आहे. हा किल्ला सर करणारी शर्विका ही सगळ्यात छोटी गिर्यारोहक असल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version