तळा प्रीमियर लीग उत्साहात संपन्न

| तळा | प्रतिनिधी |

तळा क्रिकेट असोसिएशन आयोजित तळा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा शहरातील आनंदवाडी मैदान येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांनी व जवळपास 204 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 1 लक्ष रुपये तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 50 हजार रुपये ठेवण्यात आले होते. यांसह मालिकावीरसाठी फ्रीज व उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजसाठी सायकल असे अनेक भरगोस बक्षिसे अयोजकांमार्फत लावण्यात आली होती.

अंतिम सामना हा स्वराज जयराज आई ससाई देवी क्रिकेट संघ वाली व सोहम सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये झाला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत स्वराज जयराज आई ससाई देवी क्रिकेट संघ वाली या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले. तर सोहम सुपर किंग्ज हा संघ उपविजेता ठरला. दिवसरात्र सुरू असलेल्या या स्पर्धेला अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्याकरिता 12 सहभागी संघ तसेच, तळा क्रिकेट असोसिएशन कमिटी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version