| पनवेल | वार्ताहर |
तळोजा पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकावर कारवाई केली आहे. तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कंन्स्ट्रक्शन कंपनीजवळ बांगलादेशीय नागरिक कबीर हबीबुर शेख (20) हा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत व त्यांच्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले आहे व त्याच्याकडे भारतीय कागदपत्रे सापडली नाहीत म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.