तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा

जय हनुमान रासळ विजयी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोबिवली, कल्याण तालुका यांच्यावतीने भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत तालुक्यातील 32 संघांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये जय हनुमान रासळ या संघाने विजयाची मोहर उमटवली. या स्पर्धेतील अंतिम विजयी जय हनुमान रासळ या संघास रोख रक्कम 21 हजार रु व आकर्षक चषक, तर उपविजेता मानकरी श्री नाथभैरव झाप या संघास रोख रक्कम 15 हजार रु व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक स्वयंभू हनुमान चिवे संघास रोख रक्कम 10 हजार रु व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक भैरिनाथ क्रीडा मंडळ वावे या संघास रोख रक्कम 10 हजार रु व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडु नितेश लहाने( रासळ) उत्कृष्ट चढाई प्रदीप हिर्डेकर(वावे)उत्कृष्ट पक्कड कल्पेश देशमुख(झाप), पब्लिक हिरो स्वप्नील भिलारे (चिवे) या खेळाडूंना मंडळाच्या वतीने आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राजेश मोरे, उपमहापौर शरद गंभीरराव, महेश पाटील विठ्ठल घाडगे, रमेश सागळे, प्रकाश शिलकर, राकेश थोरवे, अविकांत साळुंखे, यशवंत कदम, संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवर यांची उपस्थितीत होते .

Exit mobile version