मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात टँकर पलटी

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटातील भोगाव गावचे हद्दीत खचलेल्या रस्त्यावर केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना गुरुवार रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने चालक बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालक अंकित राजेश कुमार यादव (30) राहणार प्रतापगड राणीगंज उत्तर प्रदेश हा आपल्या ताब्यातील टँकर (क्रमांक -जीजे -13-बीडब्ल्यू -3544) घेऊन लोटे ते दौंड पुणे असा जात असताना कशेडी घाटात भोगाव गाव हद्दीत आला असता महामार्गावरील सुमारे 90 ते 120 फूट लांब व चार फूट खोल खचलेल्या रस्त्यावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पलटी होऊन महामार्गावर असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकला आहे. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान एकेरी वाहतूक सुरू आहे. सदर टँकरमध्ये वाहनांचे सीट कव्हर बनविणारे फोम केमिकल असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Exit mobile version