पीएनपीचे तन्वेश, शिव चमकले

बांबू उडी स्पर्धेत नेत्रदीपक यश

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुंबई विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा सोमय्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुंबई विद्याविहार येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत पीएनपी होली चाईल्ड इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी तन्वेश सुधीर कडवे आणि शिव शिवराम निर्मल यांनी बांबू उडी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. दरम्यान, या दोन्ही खेळाडूंच्या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, होली चाईल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल एसएससी बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, क्रीडा प्रशिक्षक अक्षय डाकी व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version