| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील ढोकळेवाडी शाळेतील शिक्षक अमोल कांबळे (वय 37) यांनी शाळेत गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण सुधागड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक कांबळे हे अनेक दिवस मानसिक तणावात होते. अचानक त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची पाली पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कांबळे यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे हे करीत आहेत.
ढोकळेवाडी येथे शिक्षकाची आत्महत्या
