। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील 25 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले पाहिजेत. यासाठी जुलै महिन्यापासून अतिरिक्त वर्ग घेण्याचे नियोजन राबविले जात असून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन टेस्ट घेण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी गट शिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
तालुक्यात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असंख्य विद्यार्थी आपली नोंदणी करतात. मात्र, शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि शिष्यवृत्ती मिळविणार्या विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम असते. कर्जत तालुक्यात यावर्षी इयत्ता पाचवी आणि आठवी या पूर्व प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 1078 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत. त्यात रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या 520 इतकी असून तालुक्यातील 222 शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देत आहेत. गतवर्षी कर्जत तालुक्यातील केवळ 11 टक्के विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाले होते. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकविणारे शिक्षक यांनी देखील आपल्या विभागाच्या प्रमुख्याच्या माध्यमातून देण्यात आलेले टार्गेट स्वीकारले आहे.
तालुक्यात ठराविक ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा देणार असलेल्या या सर्व विद्यार्थ्यंसाठी विशेष वर्ग घेतले जात आहेत.