। चौक । वार्ताहर ।
शिक्षक संघाचे नेते व प्राथमिक शिक्षक दिलीप दत्तात्रेय देशमुख 35 वर्षाच्या अखंड सेवे नतंर निवृत्त झाले. त्यांच्या निरोपाचा कार्यक्रमास सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.1986 साली रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालेले दिलीप देशमुख शिक्षक संघाचे नेते झाले,जिल्ह्यातील माणगांव,पाली या तालुक्यासह खालापूर तालुक्यातील विविध गटात त्यांनी काम केले.रायगड जिल्हा परिषदेने त्यांचा आदर्श शिक्षक म्हणूनही गौरव केला आहे. निवृत्ती पूर्वी कलोते ठाकूरवाडी शाळेला साडेतीन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. कार्यक्रमास विश्वनाथ पाटील,उमेश गावंड,रवींद्र म्हात्रे, उमेश विचारे यांच्यासह कुटुंबातील सदस्य, शिक्षक,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







