तेजस्वी किड्स क्लबचे स्नेहसंम्मेलन

| खोपोली | वार्ताहर |

खोपोली येथील तेजस्वी किड्स क्लब या प्री स्कुलचे दुसरे वार्षिक स्नेहसंम्मेलन नुकतेच रोटरी क्लब हॉलमध्ये उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनाला दिवाकरन पिल्ले दाम्पत्य प्रमुख पाहुणे लाभले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व क्रीडा स्पर्धेत विजेत्या विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.

श्री. पिल्ले यांनी उपस्थित पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, प्री स्कुलमध्ये राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांचे कौतुक केले. खोपोलीमध्ये अशाप्रकारे सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. अभ्यासक्रम राबविला जातो याबद्दल शाळेचे आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक, शिक्षकांंसह संचालक अविनाश राऊत, तेजस्वी देशमुख, संगिता राऊत, शिक्षिका इंदरजी घांजल, कवलजित सिंग, शिक्षकेतर कर्मचारी यांनीदेखील नृत्य व गाणी गात कला सादर केली.

Exit mobile version