| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग – पेण मार्गावर रविवारी सकाळी टेम्पो व कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवीतहानी टळली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक प्रवीण पाटील अधिक तपास करीत आहेत.
तुर्भे येथील राम आसरे ( 39 ) हा चालक त्याचा टेम्पो घेऊन रविवार ( ता. 07 ) रोजी पनवेलकडून रेवदंड्याकडे जात होता. पेण मार्गावरून अलिबागकडे येत असताना, सागाव मारुती मंदिर येथे आल्यावर पुढे जाणार्या कारला टेम्पोची जोरदार धडक लागली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. गतिरोधक आल्यावर कारने वेग कमी केला. मात्र टेम्पो चालकाच्या लक्षात आले नाही. त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने हाअपघात झाल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.