टेम्पाने दिली डंपरला धडक

पनवेल । वार्ताहर ।
भरधाव टेम्पोवरील चालकाने एका डंपरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून टेम्पो चालक जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कोन सावळा रोडवर घडली आहे. टेम्पो चालक प्रमोदकुमार मलिक गिरी (30) हा त्याच्या ताब्यातील टेम्पो घेवून भरधाव वेगाने कोन-सावळा रोडवर टेक केअर लॉजिस्टीक समोर कोनकडे येणार्‍या रस्त्यावरुन जात असताना त्याने एका डंपरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून तो स्वतः जखमी झाल्याने त्याच्या विरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version