सहा प्रवासी जखमी
पनवेल | वार्ताहर |
भरधाव वेगाने जाणार्या आयशर कंपनीच्या कंटेनरने एसटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना पनवेलजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेजवळ कोन ब्रीज पनवेल एक्झिटवर घडली आहे.
आयशर कंटेनर क्र. एमएच 04 एचवाय 5281 हा घेऊन त्याचा चालक भरधाव वेगाने पनवेलजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेजवळ कोन ब्रीज पनवेल एक्झिटवरून जात असताना त्याने एसटी बस क्र.-एमएच 14 बीटी 3253 हिस पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एसटी बसचालक मुदस्सीर रसुलसाब शेख (37), कावेरी पाटील (21), दत्ता पवार (40), रंजना शिराळकर (56), वर्षा परंजापे (53), किशोर खांडे भरड (32) हे जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर कंटेनरचालक पसार झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.