| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील वांवढळ गावाजवळ जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो, रिक्षा आणि दुचाकी यांच्यात अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार स्वप्नील चौधरी (40) हे जखमी झाले असून, तीनही वाहनांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांवढळ येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून समोरून जात असलेल्या रिक्षाला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो महामार्गाचा दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेला आणि समोरून येणाऱ्या स्वप्नील चौधरी यांच्या दुचाकीला धडकला. या अपघातात स्वप्नील चौधरी यांच्या दोन्ही खांद्यांना तसेच पाठीच्या मणक्यांना गंभीर दुखापत झाली असून, अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक
