चौक-कर्जत मार्गाची वरवर डागडुजी

प्रवासी, वाहनचालकांकडून नाराजीचा सूर

| पाताळगंगा | वार्ताहर |

चौक-कर्जत या मार्गावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असल्यामुळे वाहन चालविणे त्रासदायक झाले आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघातालासुद्धा सामोरे जावे लागत होते. वाहनचालकांच्या तक्रारीनंतर रस्त्यावरील संबंधित विभागाने खडी, डांबर टाकून वरवर मलमट्टी करण्याचा प्रयत्न केल्याने प्रवासी, वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, अनेकवेळा या मार्गावर पडलेले खड्डे वाहन चालकांच्या निदर्शनास न आल्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शारीरिक व्याधींसह वाहनांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याची मागणी संबंधित विभगाकडे लावून धरण्यात आली होती. आत खड्डे खडी, डांबर टाकून बुजविण्यात आले असले तरी ते रस्त्यापेक्षा अधिक उंचवटा तयार झाला असून, त्यावरुन वाहन गेल्यावर ते जोराने आपटत असल्याने अधिक त्रासदायक झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.

Exit mobile version