रायगडात निवडणुकीसाठी दहा हजार मशीन दाखल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

2024 मध्ये होणार्‍या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शासन स्तरावर प्रशासकीय कामकाज योग्य पध्दतीने व्हावे यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दहा हजार 540 बॅलेट व कंट्रोल युनिट मशीन दाखल झाल्या आहेत. त्यात सहा हजार 700 बॅलेट युनिट व तीन हजार 750 कंट्रोल युनिट मशीनचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे. लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये रायगड जिल्ह्यातील चार व रत्नागिरीमधील दोन अशा सहा विधानसभा मतदार संघ आहेत. 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. त्यानुसार जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट मशीन आणण्याची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरु केली आहे. बंगलुरमधील बेल कंपनीच्या या मशीन मागविल्या आहेत. बॅलेट युनिट सहा हजार 700 व कंट्रोल युनिटच्या तीन हजार 750 मशीन उपलब्ध झाले असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली.

Exit mobile version