| पुणे | प्रतिनिधी |
पॉल प्रो-टेनिस अकादमी आयोजित एक लाख रुपये पारितोषिक रकमेच्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रज्वल तिवारी, पंशुल उबोवेजाने मानांकित खेळाडूंवर विजय प्राप्त करीत आपली आगेकूच कायम राखली.
या स्पर्धेत एकेरीत महाराष्ट्राच्या प्रज्वल तिवारीने दुसऱ्या मानांकित संदेश कुरळेचा 6-4, 3-6, 6-0 असा, क्वालिफायर महाराष्ट्राच्या पंशुल उबोवेजाने सातव्या मानांकित निरव शेट्टीचा 7-5, 6-1 असा पराभव केला. चौथ्या मानांकित प्रसाद इंगळेने परितोष पवारवर 6-3, 6-4 असा, पाचव्या मानांकित अजमीर शेखने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश मिळविलेल्या सक्षम भन्साळीवर टायब्रेकमध्ये 7-6 (4), 6-3 असा, काल मानांकित खेळाडूंवर विजय मिळवणाऱ्या मनन अग्रवालने स्वराज ढमढेरेवर 6-1, 7-5 असा विजय मिळविला. वरद उंद्रेने रघुनंदन आरचे आव्हान 6-3, 6-0 असे, अव्वल मानांकित मध्य प्रदेशच्या दीप मुनीमने महाराष्ट्राच्या ओमेश औटीला 6-1, 6-0 असे पराभूत केले.
पुण्यात टेनिसचा थरार! प्रज्वलतिवारीचा दमदार उलटफेर
