एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्य
। सिल्लोड । वृत्तसंस्था ।
सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास झाला. भराडी रोडवर ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्याचे कडेला नादुरुस्त अवस्थेत उभे होते. यावर छोटा टेम्पो आदळून हा अपघात झाला आहे. तर 14 जण जखमी झाले आहे.
या भीषण अपघाताची माहिती अशी की, घाटशेंद्रा (ता.कन्नड) येथून लग्न समारंभ आटोपून गावाकडे मंगरूळ (ता.सिल्लोड) येथे येत असतना सिल्लोड शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोढा फाटा येथे उसाने भरलेला ट्रॅक्टरवर पिकअप व्हॅन क्रमांक (एम. एच. 20.सी. टी.2981) आदळून मोठा अपघात घडला अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की पीकअप वाहणाचे दोन तुकडे होऊन वाहन अस्ताव्यस्त झाले.
अपघातामध्ये मंगरूळ येथील खेळवणे कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ, दोन सख्ख्या जावा आहेत. अपघातातील 6 मृतदेहांवर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, तर काही जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात तर काहींना औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात पाठविन्यात आले.
घटनेची माहिती मिळताच महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्याचबरोबर रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मृतदेह मंगरूळ येथे पाठविण्याची व्यवस्था केली. यावेळी रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम म्हेत्रे यांची उपस्थिती होती.