| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ बंद पडललेल्या ट्रकवर भल्या पहाटे चार वाहने धडकली या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मालवाहतूक ट्रकला, खाजगी बस व पाठीमागून येणाऱ्या चार गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात तीन जण जागीच मृत्यू झाले असून जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की यात अपघातग्रस्त वाहनांचा चक्काचूर झाला आहे. बसच्या काचा तुटल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमका हा अपघात कसा झाला अद्याप समजलेले नाही. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने कोंडी निर्माण झाली.