| पुणे | प्रतिनिधी |
पुणे-नाशिक महामार्गावर आज शुक्रवार (दि.7) पहाटे एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुण्याकडे येणाऱ्या खासगी लक्झरी बसला मागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात 40 ते 50 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की लक्झरी बसचा चक्काचूर, प्रवासी हादरले बसचा समोरील भाग संपूर्ण उद्ध्वस्त झाला. बसमध्ये प्रवासी झोपेत असताना हा अपघात घडल्यामुळे अनेकांना गंभीर दुखापती झाल्या. बसच्या काचा फुटल्या असून, प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताच्या थारोळ्या दिसून आल्या.
सकाळच्या सुमारास पुण्याकडे येणारी खासगी लक्झरी बस महामार्गावरून वेगात जात असताना मागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने तिला जोरदार धडक दिली. कंटेनरच्या या जबर धडकेमुळे बसवरील ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि बस महामार्गावरच उलटली. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तत्काळ मदत करत त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. महामार्ग पोलिसांनी तातडीने क्रेन आणि बचाव पथकाच्या मदतीने बस बाजूला करण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. प्रशासनाने तातडीने वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







