भयानक! कोल्ड कॉफीमध्ये आढळले झुरळ

 | मुंबई | प्रतिनिधी |

मालाडमधील आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्याची घटना ताजी असतानाच आता कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याची तक्रार करण्यात आली आहे. प्रतीक रावत या तरुणाने त्याने ऑर्डर केलेल्या कोल्ड कॉफीमध्ये झुरळाचे अवशेष आढळून आल्याची तक्रार केली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी हॉटेल मॅनेजर, वेटर आणि अन्य संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक रावत आणि त्याचा मित्र मालाड इनॉर्बिटमधील दुसऱ्या मजल्यावरील लॉन्जमध्ये कॉफी पिण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला आहे. स्ट्रॉने कॉफी पिऊन झाल्यानंतर काचेच्या ग्लासात झुरळाचे अवशेष दिसू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रतीक रावत याने मालाड पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी हॉटेल मॅनेजर, वेटर आणि अन्य संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मालाड पोलीस करीत आहेत.

त्यांनी घडलेल्या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ काढला होता. तो पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला. पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली. मालाड येथील हॉटेलमध्ये ग्राहकाने मागविलेल्या कोल्ड कॉफीमध्ये झुरळ सापडल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा हॉटेलमधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

 

Exit mobile version