काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन कर्मचारी शहीद

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू-काश्मीरमधील बंदीपोरा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले. बंदीपोरामधील गुलशन चौक भागात शुक्रवारी पोलिसांवर दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन पोलीस कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. एसजीसीटी मोहम्मद सुल्तान आणि सीटी फैयाज अहमद अशी या दोन कर्मचार्‍यांची नावे आहेत. इतर कर्मचारी जखमी झाले आहेत. सध्या या भागाला घेरण्यात आलं आहे.

Exit mobile version