दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर हल्ला


श्रीनगर | वृत्तसंस्था |
जम्मू काश्मीरमधील सोपोर भागात शनिवारी पुन्हा एकदा सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झालाय. आरामपोरा नाक्यावर हा हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.दहशतवाद्यांकडून पोलीस आणि सीआरपीएफच्या एका संयुक्त तुकडीला निशाणा बनवण्यात आलं. या टीमवर दहशतवाद्यांकडून बेधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत तर दोन सामान्य नागरिकांनाही यात आपला जीव गमवावा लागलाय. हे दोघे जण भाजी विक्रिते असल्याचं समजतंय. गंभीर जखमी झालेल्या दोन जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Exit mobile version