भिवंडी | वार्ताहर |
भिवंडी-ठाणे येथे होणार्या 69व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता यजमान ठाण्याचे दोन्ही संघ आज जाहीर करण्यात आली. श्री.समर्थ मंडळाच्या उमेश म्हात्रेकडे पुरुष, तर शिवतेजच्या माधुरी गावंडीकडे महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. ठाण्याच्या पुरुष संघात जय बजरंग-वाशिंदचे दोन खेळाडू आहेत. महिला गटात विजेत्या रा.फ. नाईक, होतकरू, ज्ञानशक्ती या संघाच्या दोन-दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे. भिवंडीतच सामने होत असल्यामुळे ठाण्याच्या दोन्ही संघापुढे मोठे आव्हान असणार आहे. आज हे दोन्ही संघ एका परिपत्रकाद्वारे ठाण्याचे सरकार्यवाह मालोजी भोसले यांनी प्रसार माध्यमांकरिता जाहीर केले. ठाण्याचे दोन्ही संघ खालील प्रमाणे.
ठाण्याचा पुरुष संघ :- 1)उमेश म्हात्रे-(संघनायक) श्री समर्थ मंडळ, 2)सुशिल भोसले(उपसंघनायक), ओम कबड्डी, 3)अक्षय भोईर-उजाला मंडळ, 4)सुरज दुन्डले-ग्रिफीक जिम., 5)निलेश साळुंखे- शिवशंकर, 6)राजू कथोरे-जय बजरंग, 7)परेश हरड-मोरया मंडळ, 8)अतुल देसले-जय बजरंग, 9)परेश म्हात्रे-हुतात्मा शांताराम, 10)वैभव पाटील-जय हनुमान, 11)आप्पाजी पाटील- आनंदस्मृती, 12)विघ्नेश चौधरी-विजय मंडळ.
प्रशिक्षक:- शिवानंद पाटील, व्यस्थापक :- शिवदास पाटील.
महिलांचा संघ :- 1)माधुरी गवंडी(संघनायिका)- शिवतेज मंडळ, 2)मेघना खेडेकर(उपसंघनायिका)-संकल्प मंडळ, 3)प्राजक्ता पुजारी-होतकरू, 4)मानसी गायकर-ज्ञानशक्ती, 5)साक्षी भोईर-जय बजरंग, 6)निधी जोशी-ज्ञानशक्ती, 7)चैताली बोराडे-होतकरू, 8)सायली साळुंखे-रा.फ.नाईक, 9)तनुजा गोळे-रा.फ.नाईक, 10)चिरल कासार-छत्रपती, 11)चंद्रिका जोशी-केळकर- प्रेरणा, 12)देवयानी पाटील- संघर्ष.
प्रशिक्षक:- किरण मांजे व्यवस्थापिका :- हर्षला शेंडगे(मोरे).
