नेरळमधील महिलांची पोलिसांकडे मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या शरीराचे तुकडे करून मारणार्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन नेरळ गावातील महिलांनी नेरळ पोलिसांना दिले.
नेरळ गावातील असंख्य महिला या मागणीचे निवेदन देण्यासाठी नेरळ पोलीस ठाणे येथे पोहचल्या होत्या. नेरळ गावातील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत यशश्री शिंदे हिच्या मारेकर्याला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नेरळ पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी शासनालावरील निवेदन तत्काळ पाठवले जाईल, असे आश्वासन महिला वर्गाला दिले. याप्रसंगी सुमन लोंगले, सुजाता मनवे, माजी उपसरपंच प्रीती देसाई, कल्पना चव्हाण, राखी गुरव, निता हनुमंते, पूजा घोडविंदे, रेश्मा शिंदे, अक्षता उतेकर, भारती मनवे, अश्विनी शिंदे, सुनीता भगत, तेजल शिंदे, वैष्णवी ईरमाली, मेघा बैकर आदी सह अनेक महिला उपस्थित होत्या.
