| नेरळ । वार्ताहर ।
तालुक्यातील सर्वात मोठी सहकारी सोसायटी असलेल्या नेरळ विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचा कारभार पारदर्शी ठेवण्यावर भर दिला जावा, अशी अपेक्षा शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे यांनी व्यक्त केली. नेरळ येथील सेवा सोसायटीचे कार्यालय अद्ययावत बनविण्यात आले. त्या कार्यालयाचे लोकार्पण बुधवारी (दि.1) राणे यांचे हस्ते आले. शेतकरी भवन मध्ये हे नवीन कार्यालय सुरू झाले आहे, यावेळी ते बोलत होते.
तालुक्यात पूर्वीच्या 17 सहकारी सोसायट्या रद्द करून नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी निर्माण झाली होती. कोषानेपासून शेलू आणि कळंब पर्यंत परिसर यांचा समवेश असलेल्या नेरळ विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये समावेश आहे. त्यामुळे या सोसायटीकडे सहकार महत्वाचे स्थान आहे. या सोसायटीचे नेरळ मध्ये शेतकरी भवन असून तेथे व्यवसायिक गाळे आणि मंगल कार्यालय आहे. त्या इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या व्यवसायिक गाळ्यामध्ये गेली अनेक वर्षे सोसायटीचे कार्यालय सुरू असायचे. तेथे लहानशा जागेत सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि साचिव तसेच सर्व सदस्य हे एकत्र बसायचे. लहानशा जागेत असलेले प्रशस्त जागेत असावे अशी सूचना पुढे आली. आता शेतकरी भवनमधील पहिल्या मजल्यावर भव्य कार्यालय तयार करण्यात आले. त्या कार्यालयात अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष यांचे दालन तसेच सचिव यांचे कार्यालय आणि मीटिंग हॉल तयार करण्यात आले आहेत.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नागो गवळी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हजारे, नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र विरले, विष्णू कालेकर, वैभव भगत, धोंडू आखाडे, शशिकांत मोहिते, यशवंत कराळे, अर्चना शेळके, कुंदा सोनावळे, सुहास कोकाटे, शेकाप युवक अध्यक्ष महेश म्हसे, रामदास हजारे, कृष्णा शिंगे,मारुती विरले, जयेंद्र कराळे, दिलीप शेळके, संदीप मसणे, विलास भागित, दीपक पाटील यांच्यासह अनेक उपस्थित होते.