उद्यापासून रंगणार आयपीएलचा महासंग्राम

ऐतिहासिक एमए चिदंबरम स्टेडियम सज्ज

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

चेन्नईतील ऐतिहासिक एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर 22 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएल 2024 च्या हंगामातील पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात रंगणार आहे. यावेळी दोनही संघ सज्ज असताना चेपॉक देखील सज्ज झालं आहे. चेपॉक स्टेडियमवरील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध गायक ए. आर. रहमान आणि सोनू निगम आयपीएल 2024 च्या उद्घाटन समारंभात परफॉर्मन्स करणार आहे. 22 मार्च रोजी होणार्‍या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ देखील परफॉर्म करणार आहेत. उद्घाटन सोहळा सांयकाळी 6.30 वाजता सुरू होईल आणि सामना 7.30 वाजता सुरू होईल.

आयपीएल 2024 ची सुरुवात ब्लॉक ब्लास्टर सामन्याने होणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला घरच्या मैदानावर आव्हान देताना दिसणार आहे. दोन्ही संघांबद्दल बोलायचे झाले तर आरसीबी प्रत्येक विभागात संतुलित दिसत आहे. त्याचवेळी सीएसकेचे गोलंदाजी आक्रमण थोडे कमजोर दिसत आहे. यासोबतच डेव्हॉन कॉनवे आणि पाथीरानाला झालेल्या दुखापतींमुळेही सीएसकेच्या ताफ्यात टेंन्शन वाढले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स
सध्या 7 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर झाले असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर न झाल्याने उर्वरित वेळापत्रक जाहीर केले जाईल. 24 मार्चला आयपीएल 2022चे विजेते आणि गेल्या वर्षीचे उपविजेते गुजरात टायटन्स आणि पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स रविवारी अहमदाबादमध्ये आमनेसामने येणार आहेत.
Exit mobile version