चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था
छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्रगाथा ओघवत्या शैलीत लेखन आणि वक्तृत्व यांद्वारे मांडणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे ब्राह्मतेजाची धगधगती ज्वाला शांत झाली आहे. शिवछत्रपतींविषयीच्या निस्सीम भक्तीच्या बळावर त्यांनी जात्यंधांचा विरोध सहन करून गेल्या अनेक पिढ्या आणि अनेक दशके महाराष्ट्राला मशिवसाक्षरफ करण्यात मोलाचा वाटा उचलला होता.