मुरुड समुद्रकिनारी एका वृद्ध महिलेचा सापडला मृतदेह

मुरुड | नितीन शेडगे | 

मुरुड समुद्रकिनारी एकदरा पुलाजवळ एका वृद्ध महिलेचा मृतदेह समुद्रातील पाण्यावर तरंगताना परिसरातील नागरिकांना आढळून आला. त्यांनी मुरुड पोलिस स्टेशनला खबर देताच पोलीस निरीक्षकपरशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वैभव साळुंके व इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतदेहाची ओळख अजून पटली नसून निरीक्षण केले असता ती महिला आदिवासी समाजातील असावी असा प्राथमिक अंदाज असून सदरचा मृतदेह मुरुड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून तालुक्यातील सर्व आदिवासी वाड्यांवर पोलीस यंत्रणा तपास करीत आहेत.

Exit mobile version