6 जणांचा मृत्यू, 12 जखमी
। पटना । वृत्तसंस्था ।
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्येमोठी दुर्घटना घडली आहे. बेला इथं कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला. यामुळे किमान 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 12 जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बॉयलर फुटल्यानंतर जवळपास 5 किमी परिसरात त्याचा आवाज ऐकू गेला असल्याचं सांगितलं जात आहे. स्फोटामुळे आजुबाजुला असणार्या कारखान्यांचेही काही नुकसान झाले आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.